आयुर्वेदोक्त सुवर्णप्राशन संस्कार विधी
सुवर्णप्राशनं हि एतत् मेधाग्निबलवर्धनम् ।
आयुष्यं मंगल पुण्यं वृष्यं वर्ण्य ग्रहापहम् ॥
मासात् परम्मेधावी व्याधिभिर्नच धृष्यते ।
षड्भिर्मासैः श्रुतधरः सुवर्णप्राशनाद् भवेत् ॥
(कश्यप संहिता, सूत्र स्थान)
सुवर्ण प्राशन म्हणजे काय ?
प्रत्येक महिन्यातील पुष्य नक्षत्रादिवशी मुखावाटे चाटणाच्या स्वरूपात सुवर्ण प्राशन केल्यास बालकांचा शारीरिक, बौध्दिक व सर्वांगीण विकास होतो.हे औषधे शुध्द सुवर्ण भस्म, ब्राम्ही, शंखपुष्पी, अश्वगंधा, वचा अशा वनस्पती वापरून हे चाटण दिले जाते.
सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये आपले मुल सुदृढ असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी पालक धडपडत असतात व आपल्या पाल्यास उत्तमोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करीत असतात.
मात्र हे प्रयत्न सुयोग्य वयामधे होणे गरजेचे असते. आपल्याकडे एक म्हण आहे "आडात असेल तरच पोहऱ्यात येईल" त्याप्रमाणे आपल्या पाल्याची सहणशक्ती व बुध्दीमत्ता असेल तरच फायदा होईल.
यासाठी पुराण कालापासून भारतवर्षात सुरू असलेले सुवर्णप्राशण संस्कार प्रत्येक बालकास अत्यंत आवश्यक आहे. संशोधनाअंती हे सिध्द झाले आहे की, सुवर्ण हे बुध्दीवर्धक व व्याधीप्रतीकारक क्षमता वाढविणारे आहे. सुवर्णप्राशन विधी म्हणजे सुवर्णभस्म व आयुर्वेदातील बुध्दीवर्धक औषधे यांचा केलेला अमृतमय संगम होय.
सुवर्ण प्राशन बिंदू म्हणजे काय हे औषध शुध्द सुवर्ण भस्म, ब्राहमी, शंखपुष्पी, वचा अशा अनेक आयुर्वेदिक
वनस्पतींपासून सिध्द केलेल्या गाईचे शुध्द तुप वापरून बनवलेले आहे. याचे आयुर्वेदिक शास्त्रोक्त पध्दतीने प्रत्येक नक्षत्रा दिवशी मुखावाटे (चाटण स्वरुपात) सेवन केल्यास बालकांची शारिरीक, बौध्दिक व सर्वांगीण विकास होतो.
पुष्य नक्षत्रच का ?
पुष्य नक्षत्र आयुर्वेदामध्ये अत्यंत मंगल मानते आहे. हा दिवस यश मिळवून देणारा दिवस म्हणून ओळखला जातो. पुष्य नक्षत्राचा राजा ज्ञानदेवता बृहस्प आहे. तसेच पुष्य शब्दात पोषण लपलेले आहे. एकूणच या दिवशी औषध सेवन केल्याने त्याचा शरीरावर खुप प्रभावी परीणाम दिसून येतो.
सुवर्णप्राशन वेळापत्रक.
सुवर्णप्राशनचे फायदे
रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
• स्मृती, बुध्दी आकलन सामर्थ्य इ. चांगल्या प्रकारे कार्य करतात.
• शारिरीक बदल वाढतात
• दंत उत्पत्ती समयी (दात येताना) होणाऱ्या विविध रोगांपासुण संरक्षण मिळते.
• सुकुमार कांती प्राप्त होते
• वायु प्रदुषणामुळे होणाऱ्या श्वसन विकाराविरुध्द प्रतिकार शक्ती वाढते
• ऋतुबदलामुळे होणाऱ्या रोगापासून संरक्षण मिळते
• वेगवेगळ्या अलर्जीपासून संरक्षण मिळते.
पाचण शक्ती वाढते
• आजच्या काळात वापरल्या जाणाऱ्या निकृष्ट आहार व रासायनिक खतामुळे होणारे दुष्परीणाम टाळण्यास अमृता प्रमाणे काम करते
• एकूणच इतर मुलांपेक्षा सुवर्णप्राशण घेतलेले मूल अधिक सुदृढ व बलवान बनते.
No comments:
Post a Comment