Welcome!!!

A very warm welcome to you!!!

Tuesday, March 1, 2022

Childerns and their Immunity

 

लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती आणि आयुर्वेद

            व्याधी(आजार) निर्माण करणाऱ्या हेतूंचा शरीराशी संबंध आल्यास, त्यांचा शरीरात रोग किंवा आजार निर्माण करण्याकडे  कल असतो. परंतु त्याच वेळी शरीराचा आजार उत्पन्न होऊच नये यासाठी प्रयत्न सुरु असतो. शरीराचा व्याधीविरोधी हा जो प्रयत्न असतो त्यालाच रोगप्रतिकारशक्ती असे म्हणतात.

            शरीराचे हे प्रयत्न दोन प्रकारचे असू शकतात.

. रोग/ आजार उत्त्पन्न होऊच देणे.

. आणि  झालाच तर त्या आजाराला बलवान होऊ देणे. म्हणजेच आजाराच्या बलाला विरोध करणे व शरीराचे रक्षण करणे.  

            काही मुले वारंवार काळजी घेऊनही, पथ्याचे पालन करूनही आजारी पडतात तर काही अपथ्य करूनही कधीच आजाराला बळी पडत नाहीत. असे का होते बरं ...?  उत्तर एकच- रोगप्रतिकारशक्ती.


1.    रोगप्रतिकारशक्ती म्हणजे तरी नेमक काय..?

                 रोग:सर्वे अपि मंदाग्नो ।।   

          आयुर्वेदानुसार रोगप्रतिकारशक्ती चा सामान्यपणे जठराग्नीशी (पचनशक्तीशी) संबंध असतो. अग्नी जर उत्तम असेल तर घेतलेल्या आहाराचे व्यवस्थित पचन होते आहारातून तयार होणारे शरीरघटक (रक्तादी) उत्तम प्रकारचे तयार होतात. त्यामुळे घेतलेला आहार, तो पचविण्यासाठीचा अग्नी म्हणजेच पचनक्रिया आणि त्यापासून तयार होणारा रक्त हा धातू या घटकांवर रोगप्रतिकारशक्ती अवलंबून असते.


 2.    रोगप्रतिकार शक्ती कमी आहे हे कसे ओळखावे..?

                       ऋतुमानातील होणाऱ्या बदलांमुळे लहान मुले लगेचच वारंवार आजारी पडतात किंवा  एकच आजार त्यांना पुन्हा पुन्हा होतो (जसे- खोकला ताप आला तो आपण औषधोपचाराने पूर्ण बरा केला तरी पुन्हा काही दिवसांनी तोच त्रास परत होणे.)                                                                                                                                                                मुलांच्या शरीरातील घटक  पोषित नसणे, त्याचबरोबर अतिस्थूल (जाडी जास्त) असणे, अतिशय बारीक, दुर्बल असणे  (रक्तादी धातू पुष्ट नसणे ) आवश्यक शरीर घटक योग्य त्या प्रमाणात नसणे. चुकीचा आहार अतिशय अल्प किंवा अधिक प्रमाणात घेणे. या सर्व कारणांमुळे शरीराचे पोषण नीट झाल्याने रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ शकते.


 3.    रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी..?

          लहान मुलांच्या रोगप्रतिकार शक्तीचा विचार करता, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न हे त्यांच्या जन्मापूर्वीपासूनच करावे लागतात. बीजसंस्कार या गर्भधारणेपूर्वीच करावयाच्या आयुर्वेदीय संकल्पनेमध्ये याचे वर्णन केले आहे. त्याचबरोबर गर्भधारणा झाल्यावर बाळाच्या जन्मानंतर करावयाच्या गोष्टींचे वर्णन गर्भसंस्कार या संकल्पने अंतर्गत  १६ प्रकारच्या गर्भसंस्कारां मधे केले आहे.

            “संस्कारोही गुणान्तराधानं ।“

यामध्ये प्रामुख्याने कर्णवेधन, लेहन . संस्कारांचा समावेश होतो. लेहन  या संस्कारामधे  सुवर्णप्राशन संस्काराचे महत्व सांगितले आहे. सुवर्णप्राशन हा जन्मापासून लगेच केला जाणारा संस्कार.  सुवर्णप्राशन हा संस्कार महिन्यातून १ वेळा पुष्य नक्षत्राला केला जातो. सुवर्णभस्मयुक्त औषधी मध व बुद्धिवर्धक औषधी तुपासह वैद्याच्या सल्ल्याने  किमान सलग ३ वर्ष देऊन घ्यावे.

सुवर्णप्राशनाचे फायदे:-

  1. रोगप्रतिकार शक्ती वाढते.
  2. बुद्धी, स्मृती, स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते.
  3. शारीरिक बल वाढते.
  4. पचनशक्ती सुधारते.
  5. मुलांचा तोतरेपणा कमी होतो.
  6. उंचीत वाढ होते.
  7. दात निघताना होणाऱ्या विविध रोगांपासून संरक्षण होते

 

4.    मानसिक स्वास्थ्य आणि रोगप्रतिकारशक्ती याचा काही संबंध असतो का...?

हो.

आयुर्वेदामध्येविषादो रोगवर्धनानाम  श्रेष्ठ:।“ असे वर्णन आले आहे याचा अर्थ असा कि रोगी मानाने खचला तर मग त्याचा व्याधी बरा करणे कठीण जाते यावरून दिसून येते कि मानसिक अवस्था देखील रोगप्रतिकारशक्ती वर परिणाम घडवून आणते. हा विचार जसा आपण तरुण किंवा वृद्ध व्यक्तींमध्ये लक्षात घेतो त्याचबरोबरीने लहान मुलांचे बाबतीत देखील हा विचार करणे आवश्यक आहे त्यांचे मानसिक आरोग्य जपणे, मनोबल सांभाळणे अत्यावश्यक आहे.

                              सध्याच्या काळात रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे हे किती आवश्यक आहे हे आपणा सर्वांना माहितीच आहे. आजार उत्त्पन्न झाल्यावर रोगप्रतिकारशक्तीचा विचार करण्यापेक्षा  आणि औषधे घेताना येणाऱ्या टेन्शनपेक्षा आधीच काळजी घेणे केंव्हाही योग्यच. नाही का..?!! तेंव्हा आपल्या मुलांना आजार होऊच नयेत झालेच तर लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी पालकांनी जवळच्या वैद्यांची नक्कीच भेट घ्या. आपल्या चिमुकल्यांची  सतत काळजी करण्यापेक्षा काळजी घ्या.


1 comment:

My Journey